Sheli Gat Vatap 2021 | 10+1शेळी गट वाटप 2021

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ

व्दारा आयोजित

Sheli Gat Vatap 2021 

10 शेळी + 01 बोकड शेळी गट वाटप योजना

मित्रांनो सालाबादप्रमाणे यावर्षीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ यांच्या वतीने 10 शेळ्या व 1 बोकड शेळी गट वाटप योजना 2021-22 करिता सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील नोंदणीकृत महिला सहकारी संस्था घेऊ शकतात चला तर जाणून घेऊया या योजनेसंदर्भात अधिक माहिती.


10+1 Sheli Gat Vatap 2021 | 10+1शेळी गट वाटप 2021

Sheli Gat Vatap 2021 

योजनेचं नाव 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ 

10 शेळ्या व 1 बोकड शेळी गट वाटपयोजनेतून मिळणार अर्थसहाय्य

 उस्मानाबादी / संगमनेरी जातीच्या 10 शेळ्या व 01 बोकड शेळी गटाची एकूण किंमत रु. ८७,८५७/- एवढी राहील.

त्यापैकी ७५ टक्के हिस्सा म्हणजेच रु. ६५,८९३/- एवढे शासनाचे अनुदान अनुज्ञेय असेल. 

उर्वरित २५ टक्के हिस्सा म्हणजेच रु. २१,९६४/- एवढी रक्कम स्वहिस्सा म्हणून लाभधारकाने भरणे आवश्यक.


स्टेट बँक ऑफ इंडीया शेळी पालन लोनसाठी अर्ज


युनियन बँक ऑफ इंडिया शेळी पालन लोनसाठी ऑनलाईन अर्ज


योजनेसाठी लाभार्थी निकष

या योजने साठी फक्त नोंदणीकृत महिला सहकारी संस्था सदस्यच पात्र राहतील.

Sheli Gat Vatap 2021 

योजनेसाठी निकष

1) राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या भटक्या जमाती (भज-क) या

मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील नोंदणीकृत महिला

सहकारी संस्थेच्या सदस्यांसाठी लागू राहील.

2) लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ५५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अपंगाकरिता ३ टक्के आरक्षण.

3) ज्या महिला लाभार्थांनी मागील ५ वर्षात पशुसंवर्धन विभागाच्या

वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे असे लाभार्थी या

योजनेस पात्र ठरणार नाहीत.

4) एका कुटुंबातील एकाच महिला लाभार्थीस या योजनेचा लाभ देण्यात

येईल.

5) ठाणबंद शेळीपालन करणे बंधनकारक,

6) शेळी गटाचा विमा उतरविणे बंधनकारक इत्यादी.


योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1) लाभार्थी संस्थेचे सर्व सदस्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स.

2) लाभार्थी संस्थेचे सर्व सदस्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स.

3) ठाणबंद पद्धतीने शेळीपालन करण्याचे हमीपत्र इत्यादी.


योजने संदर्भात अधिक माहिती करिता संपर्क

आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त.
Sheli Gat Vatap 2021 | 10+1शेळी गट वाटप 2021 Sheli Gat Vatap 2021 | 10+1शेळी गट वाटप 2021 Reviewed by Nitesh S Khandare on November 22, 2021 Rating: 5

2 comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.