Maharashtra Government Goat Farming and Dairy Farming Scheme 2021

महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने "जिल्हा परिषद योजना" 2021

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने, महाराष्ट्रातील शेळी पालन आणि दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्यासाठी "जिल्हा परिषद योजना" अंतर्गत योजना वर्ष 2021 साठी राबविली जात आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेळी पालन व दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन आपण आपला व्यवसाय सुरू करू शकता.


चला तर मग सविस्तर जाणून घेऊया "जिल्हा परिषद योजना" संबंधी अधिक माहिती.


Maharashtra Government Goat Farming and Dairy Farming Scheme 2021


महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा परिषद

योजनांचे स्वरूप .

मित्रांनो, महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकरी तसेच सुशिक्षित बेरीजगारांसाठी त्याच प्रमाणे अनुसूचित जाती जमाती तील शेतकऱ्यांना व्यवसाय उपलब्ध व्हावा आणि त्याची आर्थिक प्रगती  व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील कार्य करत असते.
त्याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागा द्वारे "जिल्हा परिषद योजनांच्या" माध्यमातून खालील योजना राबवत आहे.


महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाची जिल्हा परिषद योजना 2021

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी उपयोजनेतून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप ( दोन गाई म्हशी )

1) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व एक बोकड वाटप,

2) विशेष घटक योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थीकडील जनावरांना भाकड कालावधीसाठी शंभर टक्के अनुदानावर खाद्य वाटप,

3) जिल्हा परिषद सेस योजनेतून सर्वसाधारण लाभार्थींना पन्नास टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन वाटप करणे,

4) कामधेनु आधार योजनेतून पन्नास टक्के अनुदानावर महिला लाभार्थींना एक दुधाळ देशी, संकरित गाय किंवा एक म्हैस वाटप करणे, अशा विविध योजना राबविल्या जात आहेत.


महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाची "जिल्हा परिषद योजना 2021" साठी अर्ज नमुना

मित्रांनो,

ज्या शेतकऱ्यांना वरील दिलेल्या योजनांचा फायदा घ्यावयाचा आहे त्यांनी या योजनांसाठी अर्ज करावयाचा आहे सदर अर्ज हा आपल्या तालुक्याच्या  पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरहि उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांची निवड हि अर्जासोबत सादर केलेल्या कागद पात्रांची पडताळणी करून निवड समिती सभेत पात्र लाभार्थींची योजनेच्या निकषानुसार निवड करण्यात येईल व उपलब्ध निधीच्या मर्यादेत लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे.


महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाची जिल्हा परिषद योजना 2021 साठी अर्ज करण्याची शेवटची मुदत

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या "जिल्हा परिषद योजना 2021" या योजनेच लाभ घेऊ इच्छीत असणाऱ्या शेतकरी व तरुणांनी आपला अर्ज व्यवस्थित भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून आपल्या नजीकच्या पशुवैदकीय दवाखान्यामार्फत पंचायत समिती कडील पशुसंर्वधन विभागाकडे अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या "जिल्हा परिषद योजना 2021" या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै 2021.


विहित अर्जाचा नमुना मिळविण्यासाठी तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागास भेट द्या त्या ठिकाणी हा अर्जाचा नमून उपलब्ध आहे.


Online Application for Goat Farming Training 2021


महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाची जिल्हा परिषद योजना 2021 अंतर्गत दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या "जिल्हा परिषद योजना 2021" अंतर्गत दुधाळ जनावरांचे गट वाटप योजने द्वारे महाराष्ट्रातील

जिल्हा दुध उत्पादनास चालना देणे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.


महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या "जिल्हा परिषद योजना 2021" अंतर्गत दुधाळ जनावरांचे गट वाटप

योजनेचे स्वरूप जाणून घ्या.


फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी


दोन गाई / म्हैशींचे वाटप (प्रत्येक लाभार्थीस)


७५ टक्के अनुदान विम्यासह रु.६३७९६/-


महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाची जिल्हा परिषद योजना 2021 अंतर्गत दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना लाभार्थी निवडीचे निकष


दारिद्रय रेषेखालील लाभार्थी


अत्यल्प भुधारक शेतकरी


अल्प भूधारक शेतकरी


सुशिक्षित बेरोजगार


महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ) (३ टक्के अपंगासाठी )


महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाचीजिल्हा परिषद योजना 2021 अंतर्गत अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना शेळी गट वाटप


अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींना ग्रामीण भागात स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणेसाठी विषेश घटक योजने अंतर्गत १० अ १ शेळी गट वाटप करण्यात येतो.


योजनेचे स्वरुप


फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी


१० अ १ शेळी गट वाटप (प्रत्येक लाभार्थीस)


७५ टक्के अनुदान विम्यासह र.रु. ५३४२९/


महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाची जिल्हा परिषद योजना 2021 अंतर्गत अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना शेळी गट वाटप योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष


दारिद्रय रेषेखालील लाभार्थी


अत्यल्प भुधारक शेतकरी


अल्प भूधारक शेतकरी


सुशिक्षित बेरोजगार


महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ), (३ टक्के अपंगासाठी)


 दुभत्या जनावरांना खादय वाटप


योजनेचे उद्देश


दुभत्या जनावरांच्या भाकड काळात त्यांना खादय उपलब्ध करुन देणे.


योजनेचे स्वरुप


प्राधान्याने वरील योजनेत वाटप केलेल्या जनावरांना १०० टक्के अनुदानावर भाकड काळासाठी गाईस १५० किलो व म्हैशींस २५० किलो खादय मोफत वाटप करण्यात येतो.



Maharashtra Government Goat Farming and Dairy Farming Scheme 2021 Maharashtra Government Goat Farming and Dairy Farming Scheme 2021 Reviewed by Nitesh S Khandare on June 23, 2021 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.