Maharashtra State Shedi Gat Vatap Yojana 2021.

 

२० शेळ्या +२ बोकड शेळी गट योजना


नमस्कार मित्रांनो,

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्याच प्रमाणे सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या " पशुसंवर्धन ,दुग्धविकास विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभाग " मार्फत सन 2021- 22 करिता 20 शेळ्या आणि 02 बोकड त्याच प्रमाणे शेळ्यांच्या वाडा गट वाटप योजना राबवित आहे.
चला तर विस्तृत जाणून घेऊया "शेळी पालन योजना 2021-22" बाबत..

Maharashtra State Shedi Gat Vatap Yojana 2021


महाराष्ट्र शासनाच्या " पशुसंवर्धन ,दुग्धविकास विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभाग"  संबंधित दिनांक 12.05.2021 रोजी शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची / मेंढ्या आणि नर मेंढ्याची आधारभूत किंमत वाढविण्यास आयोजित केलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने  मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसया टप्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये २० शेळ्या+२ बोकड असा शेळी गट वाटप करणे ही योजना सन २०१७-१८ पासून राबविण्यात येत आहे ह्याच धर्तीवर सन 2021-22 या वर्षीसुद्धा ही "शेळी पालन योजना"  म्हणजेच "राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजना" राबविण्यास मंजुरी दिली आहे.


"२० शेळ्या +२ बोकड शेळी गट योजना"

"राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजना"

ह्या योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 20 शेळ्या व दोन बोकड त्याच प्रमाणे शेळ्यांचा वाडा गट वाटप करण्यात येते. सदर योजना ही खालील महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार निर्गमित केली आहे

महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग,
शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र. २३८/पदुम-४,
दिनांक : ९ जुलै, २०२१.

१. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय क्र.संकिर्ण२०१६/प्र.क्र.२३८/पदुम-४, दि.१६ नोव्हेंबर, २०१७.


२. शासन शुध्दीपत्रक क्र.संकिर्ण-२०१६/प्र.क्र.२३८/पदुम-४, दि.१७ नोव्हेंबर, २०१७.


३. शासन पूरक पत्र क्र.संकिर्ण-२०१६/प्र.क्र.२३८/पदुम-४, दि.८ फेब्रुवारी, २०१८.


४. कृषी व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र.पविआ-१०२०/प्र.क्र.११०/पदुम-३, दि.२५ मे, २०२१.


"२० शेळ्या +२ बोकड शेळी गट योजना शासन निर्णय (GR) डाउनलोड करा.


"२० शेळ्या +२ बोकड शेळी गट योजना"

"राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजना"

शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेची प्रस्तावना 
पशुंसवर्धन विभागामार्फत शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची / मेंढ्या आणि नर मेंढ्याची आधारभूत किंमत वाढविण्यास दि.१२.०५.२०२१ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.

शासन निर्णय: क्र.१ येथील दि.१६.११.२०१७ च्या शासन निर्णयातील पृ.क्र.२ वरील योजनेअंतर्गत देय अनुदान खालीलप्रमाणे वाचावे.


शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेंतर्गत देय अनुदान

शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेंतर्गत देय अनुदान निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थीला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च (शेळी गट व शेळयांसाठीचा वाडा) रू. २,३१,४००/- इतका आहे. गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यास १०० टक्के निधी स्वहिस्सा / वित्तीय संस्थांचे कर्ज याद्वारे उभा करावयाचा आहे. 

सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के तथापि, प्रति गट कमाल मर्यादा रू. १,१५,७००/- या प्रमाणे अनुदान (Back ended Subsidy) देय राहील.

२० शेळ्या +२ बोकड शेळी गट योजनेचा तपशील

Maharashtra State Shedi Gat Vatap Yojana 2021

Maharashtra State Shedi Gat Vatap Yojana 2021

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असुन त्याचा संकेतांक क्र. २०२१०७०९१४५०४४४३०१ आहे. 


Maharashtra State Shedi Gat Vatap Yojana 2021. Maharashtra State Shedi Gat Vatap Yojana 2021. Reviewed by Nitesh S Khandare on July 12, 2021 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.