Goat Farming Training In Satara Maharashtra 2019

Goat Farming Training In Satara Maharashtra

goat farming training certificate, goat farming in pune district, government goat farming training in pune, goat farming training in panvel, goat farming training in nashik, goat farming training in mumbai, goat farming in maharashtra, goat farming training in nagpur

Goat Farming Training In Satara Maharashtra 2019
www.goatfarming.ooo

आपले सर्वांचे स्वागत आहे www.goatfarming.ooo ह्या आपल्या वेबसाईट मध्ये, मित्रांनो बकरी पालन हा एक असा व्यवसाय झाला आहे की या व्यवसाया कडे बरेच शेतकरी, तरुणवर्ग त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. आपण सर्व त्यांच्या यशोगाथा टीव्ही, वृत्तपत्र तसेच सोशल मीडियावर वारंवार बघत असतो, मित्रांनो बकरीपालन सारखा साधा आणि सोपा व्यवसाय दुसरा कुठला नाही, कारण बकरी पालन व्यवसाय हा कोणीही आणि कुठेही अगदी कमी गुंतवणूक करून सुरू करू शकतो.
Goat Farming व्यवसाय हा शेती पूरक म्हणजे शेतीवर आधारित व्यवसाय असून जर शेतकरी शेती सोबत शेळी पालन करत असेल तर त्याला शेतीला पूरक हा असा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करू शकतो. मित्रांनो जर तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करू इच्छित असणार तर त्या व्यवसायतील खाचा खुचा म्हणजेच त्या व्यवसाय संबधी एक पूरक माहिती किंवा प्रशिक्षण असणे फार आवश्यक असते त्याच अनुषंगाने "क्रांतिसिह नाना पाटील, पशु वैद्यकीय महाविद्यालयात, शिरवळ जिल्हा सातारा यांच्या विद्यमानाने तीन दिवसीय Goat Farming Training प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहेत. 

Krantisinh Nana Patil, College of Veterinary Science, 

केएनपीसीव्हीएसची स्थापना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर १ 198 88 मध्ये झाली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी संस्थेचे नाव "क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ पशुवैद्यकीय विज्ञान" असे ठेवले गेले. नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर, सन 2000 मध्ये ही संस्था त्यांच्या नियंत्रणाखाली हस्तांतरित झाली.
तीन दिवसीय Goat Farming Training मध्ये खालील विषयावर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  1. शेळी पालनासाठी जागा निवड.
शेळी पालन Goat Farming करतांना Goat Farm कुठे म्हणजेच कुठल्या जागी बांधावे हा प्रश्न फार लोक विचारतात, मित्रांनो शेळी पालन करतांना शेळ्यांचे गोठयासाठी योग्य जागेची निवळ करणे फार महत्वाचे असते, शेळी पालनाची जागा ठेवतांना बरेच घटक लक्षात घ्यावे लागतात कारण जर आपण अयोग्य ठिकाणी Goat Shed बांधले तर त्याचा परिणाम आपल्या फ
Goat Farming Business वर होण्याची श्यक्यता असते.
या प्रशिक्षणात तज्ञांच्या मदतीने Goat Farming करिता योग्य जागेची निवड कशी करावी हे शिकवले जाणार आहे.

2. शेळ्यांच्या विविध जाती आणि निवड, गोठ्याची रचना आणि उभारणी
बरेच शेळी पालन व्यवसाय शेळ्याच्या चुकीच्या जातीची निवड केल्या मुळे बंद पडतात किंवा नुकसान होते, करिता आपल्या भागात कोणती शेळी जोपासणे योग्य राहील त्याच प्रमाणे विविध Goat Breeds म्हणजेच शेळ्यांच्या प्रजाती बद्दल माहिती तसेच शेळ्यांचे Goat Farm म्हणजेच गोठा कसा बांधवा त्याची उभारणी कशी करावी ही सर्व माहिती या प्रशिक्षणात मिळेल.

तसेच शेळी पालनासाठी शासकीय योजना, मटनासाठी बंधीस्थ शेळी पालन कसे करावे, शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध बँकेच्या योजना आणि शेळी पालन सुरू करण्यासाठी लोन मिळवण्यासाठी प्रकल्प अहवाल म्हणजेच Goat Farming Project Report कसा बनवावा, 
शेळ्यांचे आरोग्य तसेच हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने पशुखाद्य व्यवस्थान कसे करावे, शेळी पालन व्यवस्थापणेचा खर्च व शेळ्यांच्या विम्याचे महत्व याबद्दल तज्ञांव्दारे योग्य माहिती दिली जाईल.
तीन दिवसीय शेळी पालन प्रशिक्षणासाठी लागणारी फी

प्रत्येकी प्रशिनार्थी रुपये 1000/-

या प्रशिक्षणासाठी राहण्याची , जेवणाची व्यवस्था प्रशिक्षणार्थीला स्वतः करावी लागेल.


   तीन दिवसीय शेळी पालन प्रशिक्षण तारीख
          दिनांक  18/12/2019 सकाळी 9:00 वाजेपासून
       दिनांक  20/12/2019 संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत.

इच्छुक उमेदवारांनी खलील मोबाईल नंबर वर कॉल करून आपली सीट आजच बुक करा.
मोबाईल नंबर
7896447807
9423166904
9881994453

अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.Goat Farming Training In Satara Maharashtra 2019 Goat Farming Training In Satara Maharashtra 2019 Reviewed by Nitesh S Khandare on December 08, 2019 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.